HTML program on smartphone
विदयार्थी मित्रांनो आज आपण HTML चे प्रोग्रॅम नोटपॅड ++ मध्ये कसे रन करायचे हे पाहणार आहोत.
सर्व प्रथम Notepad++ for Android Software Play Store मधून इन्स्टॉल करून घ्यावे.
प्रोग्रॅम रन करण्याच्या पायऱ्या
१.मोबाईल वरील नोटपॅड++ आयकॉन वर क्लिक करावे.
२.स्क्रीन च्या डाव्या बाजूस असलेल्या तीन रेषेवर क्लिक करावे.
तेथे चार विकल्प येतील -१.न्यू फाईल २.ओपन फाईल ३.प्रेफरेन्स ४.इन्फो
३.आपणासाठी पहिले २ विकल्प महत्वाचे आहे.
४.आपणास नवीन प्रोग्रॅम लिहायचा असेल तर न्यू फाईल विकल्प निवडावा.
५.जर आपण या आधी टाईप केलेला प्रोग्रॅम रन करायाचा असेल तर ओपन फाईल विकल्प निवडावा.
६.सर्व प्रथम न्यू फाईल विकल्प वर क्लिक करावे ब्लँक स्क्रीन दिसेल इथे आपला प्रोग्रॅम टाईप करावा.
७.स्क्रीन च्या उजव्या बाजूस फ्लॉपी डिस्क सारखा आयकॉन आहे त्यावर क्लिक करावे.
८.क्लिक केल्यावर आपणास २ विकल्प येतील.
१.Save २.Save as क्लिक ऑन Save आणि फाईल ला .html
या एक्स्टेंशन ने Save करावे (eg.simple.html ).
९.फाईल रन करण्या साठी स्क्रीन च्या उजव्या बाजूस एक त्रिकोणी आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करावे.
१०.आपणास आपल्या HTML प्रोग्रॅम चे आउटपुट दिसेल.
1 Comments:
Click here for CommentsNice and Informative
Please Comment and Share. ConversionConversion EmoticonEmoticon